solapur karmala sairat movie famous well deilali village  AI Image
महाराष्ट्र

Solapur : 'सैराट'ची प्रसिद्ध विहीर पडली कोरडी; 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव

Solapur Karmala Sairat Well News : 'सैराट' चित्रपटातील आर्ची आणि परश्याची गाजलेली दृश्ये ज्या विहिरीवर चित्रित झाली, ती करमाळा तालुक्यातील देवळाली येथील प्रसिद्ध विहीर पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडली आहे.

Alisha Khedekar

'सैराट' चित्रपट पाहिल्यानंतर आर्ची आणि परश्याची प्रेमकहाणी अनेकांच्या लक्षात राहिली असेल. या चित्रपटातील काही गाजलेली दृश्ये ज्या विहिरीवर चित्रित करण्यात आली होती, तीच विहीर आता पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडली आहे. करमाळा तालुक्यातील देवळाली गावातील या विहिरीने तळ गाठल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवळाली येथील ही विहीर केवळ चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली नाही, तर अनेक वर्षांपासून गावकऱ्यांसाठी पाण्याचा महत्त्वाचा आधार राहिली आहे. शेतीसाठी पाणी मिळवण्यापासून ते माणसांची आणि जनावरांची तहान भागवण्यापर्यंत या विहिरीचा मोठा उपयोग होत होता. मात्र, यंदा पाण्याची पातळी कमालीची घटल्याने विहिरीत थेंबभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही.

विशेष म्हणजे, 1965 मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या काळात या विहिरीची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे या विहिरीत पाणी उपलब्ध होते. मात्र, आता पहिल्यांदाच विहीर पूर्णपणे कोरडी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात येत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या विहिरीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली.

चित्रपटातील आर्ची आणि परश्याची पायऱ्यांवरील नजरानजर, तसेच विहिरीत उड्या मारून पोहण्याची दृश्ये याच ठिकाणी चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर अनेक सिनेप्रेमींनी या विहिरीला भेट देण्यास सुरुवात केली. एकेकाळी पाण्याने भरलेली आणि गावाच्या गरजा भागवणारी ही विहीर आज मात्र ओसाड दिसत आहे. चित्रपटामुळे जिची ओळख प्रेमाच्या आठवणींशी जोडली गेली, तीच विहीर आता दुष्काळाच्या संकटाची जाणीव करून देत आहे. देवळालीतील या विहिरीची अवस्था पाहता परिसरात पाणीटंचाई किती गंभीर झाली आहे, याचा अंदाज येतो. पावसाची प्रतीक्षा आणि पाण्याचे घटते साठे यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sinus : हिवाळ्यात सायनसचा त्रास का वाढतो? नाक बंद होणे, डोकेदुखी टाळण्यासाठी करा 'हे' ५ घरगुती उपाय; मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update: चोंढी प्रकल्पातून ९७५ एकर शेतीसाठी पाणी सोडले

Political News : राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! माणगावमध्ये शिवसेनेसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सची गरज नाही! स्वयंपाकघरातील साहित्य वापरून बनवा ५ घरगुती फेसपॅक

Marathi Serial Off Air : ६ महिन्यांच्या आतच प्रवास संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

SCROLL FOR NEXT