Manasvi Choudhary
त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला व मुली खास स्किनकेअर रुटीन फॉलो करतात आणि बाजारातील महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु, काही वेळा केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्समुळे त्वचा कोरडी पडणे किंवा खराब होते.
परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांचा वापर करून नॅचरल घरगुती फेसपॅक तयार करू शकता.
त्वचेच्या काळजीसाठी मध आणि ओटमील तुम्ही वापरू शकता. मध चेहऱ्याला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करते, तर ओटमील त्वचेवरील कोरडेपणा व मृत त्वचा कमी करण्यास मदत करते. बारीक केलेले ओटमील आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि १०–१५ मिनिटांनी धुवा.
बेसन - हरभऱ्याचे पीठ तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता व उजळपणासाठी करू शकता. दही आणि बेसनाची गुळगुळीत पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
काकडी आणि कोरफड दोन्ही त्वचेसाठी अत्यंत थंड असते. ताज्या काकडीचा रस आणि कोरफडीचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्वचेला ताजेतवाने वाटते व ओलावा टिकून राहतो.
थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी झाली असेल, तर पिकलेले केळे आणि मध एकत्र करून मऊ पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहते.
जर तुमची त्वचा संवेदनशीलअसेल, तर दूध आणि ओटमील एकत्र करून सौम्य फेसपॅक बनवू शकता. दूध आणि बारीक ओटमीलची पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.