Dharashiv Diwali accident 2025 Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Dharashiv Diwali accident 2025 two luxury cars collide : धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत दोन अलिशान गाड्यांचा भीषण अपघात झाला. सफारी आणि ग्रँड विटारा गाड्यांची जोरदार धडक होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव प्रतिनिधी

Solapur Hyderabad highway crash kills four people : ऐन दिवाळीत आक्रित घडलं अन् उत्सवावर शोककळा पसरली आहे. धाराशिवमध्ये दोन महागड्या अलिशान कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कार वेगात होती त्याचवेळी अचानक रस्त्यावर कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर हा अपघात झाला. दोन वाहनांच्या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

उमरगा तालुक्यातील डाळिंब जवळ सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सफारी आणि ग्रँड विटारा या दोन महागड्या गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले, त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरूळीत केली. पोलिसांनी चार जणांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

पोलिसांकडून अपघातामधील मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात मृत्यू झालेले चारही जण बिदर येथील होते. तर जखमी झालेले दोन जण सोलापूर येथील आहेत. त्यांच्यावर सोलापूरमधील सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी चालवताना कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातात मृत्यू झालेले ४ जण धाराशिव जिल्ह्यातून आज सकाळी खासमपूर बिदरकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. दिवाळीच्या उत्सवात हे चार जण बिदरला अतिशय वेगेने जात होते. त्यावेळी सोलापूर-हैदराबाद महामार्गावर डाळिंब गावाजवळ अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला. वेगात असलेली गाडी डिव्हायडर तोडून विरोधी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर गेली. त्यावेळी समोर आलेल्या दुसऱ्या गाडीला जोरात धडक झाली. समोरून येत असणारी ग्रँड विटारा ही गाडीही अतिशय वेगात होती. कुत्र्याला वाचवायला गेलेल्या सफारी गाडीचा अपघात झाला. यात चौघांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

SCROLL FOR NEXT