Solapur Crime News saam tv
महाराष्ट्र

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

Solapur Crime News : सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने त्याच्या पत्नीची हत्या केली. बेशुद्ध अवस्थेत ही महिला सापडली. उपचारांपूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Yash Shirke

  • सोलापूरच्या न्यू बुधवार पेठ परिसरात एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली.

  • रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करण्यात आले.

  • महिलेच्या पतीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Solapur : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. यशोदा सुहास सिद्धगणेश (वय ३५ वर्षे) ही महिला आज (१४ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी यशोदा सिद्धगणेश या महिलेला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, त्यानंतर यशोदा यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात यशोदा बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या, ती गंभीररित्या जखमी होती. कौटुंबिक वादातून तिची हत्या तिच्याच पतीने, सुहासने केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यशोदा आणि सुहास या दांपत्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT