Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: कोथिंबीरचे भाव गडगडले; शेतकऱ्यांनी जुड्या फेकल्या रस्त्यावर

Solapur News: कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिल्या आहेत

विश्वभूषण लिमये

Solapur News: एकीकडे भाज्यांपाठोपाठ धान्यांचे भाव गगनाला भिडले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक गणित घालून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कोथिंबिरीचा भाव पार कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. दूर अंतरावरून वाहतूक खर्च करून आणलेल्या कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सोलापुरात कोथिंबीर आसपासच्या मंडळींनी जनावरांना चारण्यासाठी आणि किरकोळ बाजारात विकण्यासाठी उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एक कॅरेट कोथिंबिरीला दहा रूपयेसुध्दा भाव मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातून आलेल्या तीन शेतकऱ्यांना सुमारे १६० कॅरेट कोथिंबीर रस्त्यावरच फेकून द्यावी लागली.

लागवडीचा खर्च सोडाच,पण साधा वाहतुकीचाही खर्च निघत नसल्यामुळे संतप्त आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली आहे.

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीर विकण्यासाठी बीड जिल्ह्यातून दीपक गहिनीनाथ ढाक आणि अन्य दोन शेतकऱ्यांनी दोनशे कॅरेट कोथिंबीर आणली होती. परंतु प्रतिकॅरेट अवघा दहा रूपये मिळाला.या कवडीमोल भावाने जवळपास ४०-५० कॅरेट कोथिंबीर कशीबशी विकण्यात आली.

उर्वरीत १६० कॅरेट कोथिंबीर खरेदी करायला व्यापारी तयार नव्हते. तेव्हा शेतकरी अक्षरशः हतबल झाले. किमान लागवडीचा खर्च तर सोडाच,पण वाहतुकीचाही खर्च निघत नाही. उलट पदरचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहनातून कोथिंबीर उतरविलीही नाही. तर संपूर्ण कोथिंबीर तेथेच रस्त्यावर फेकून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

SCROLL FOR NEXT