Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur News: 'या महिलेच्या घाणेरड्या आरोपांमुळे आयुष्य संपवतोय', डॉ. वळसंगकरांनी शेवटच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं?

Dr. Shirish Valsangkars Note Exposes Blackmail Allegations: न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्यात एका महिलेवर थेट गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Bhagyashree Kamble

न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहेत. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी एका महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. सुसाईड नोट हाती येताच पोलिसांनी आरोपी महिलेला तातडीने अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं होतं? याची माहिती समोर आली आहे.

सुसाई़ड नोटमधील मजकूर

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यात त्यांनी, 'ज्या माणसाला शिकवून मी आज प्रशासकीय अधिकारी (ए.ओ) केलं. तसेच चांगला पगार देत होतो. त्याच व्यक्तीने माझ्यावर खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. या कारणामुळे मी अत्यंत दु:खी आहे. हे दु:ख मला असह्य झाले आहे आणि म्हणूनच मी माझे जीवन संपवतोय'. असं त्यांनी आपल्या मृत्यू पत्रात म्हटलं होतं.

रिमांड कॉपीतील ७ नमूद बाबी

आरोपी महिलेने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, तिच्या वर्तनामुळे न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे.

मृत्यूपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे की, 'मुसळे हिचे खोटे आणि घाणेरड्या आरोपांमुळे मी माझे जीवन संपवत आहे'.

आरोपी महिलेने डॉ. वळसंगकर यांना १७ एप्रिल रोजी एक ई मेल पाठवला होता. त्या ई मेलची छायांकित प्रत पोलिसांनी जप्त केली आहे.

खोटरडे आणि घाणेरडे आरोपांचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

या कृत्यामध्ये आरोपीला कुणी मदत केली होती का? कुणी सहकारी आहेत का? याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

आरोपी मनीषा माने हिच्या हस्ताक्षराचे नमुने घेणं आवश्यक आहे.

आरोपीने डॉ. वळसंगकर यांना कोणत्या प्रकारे मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले, याचा सखोल तपास करण्यासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT