सोलापूर: बँकेत खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये पेटला वाद
सोलापूर: बँकेत खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये पेटला वाद  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर: बँकेत खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये पेटला वाद

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेने रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येईल. त्यामुळे खातेदारकांचा संताप अनावर होताना पाहायला मिळतोय.

हे देखील पहा-

थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचे कारण देत बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेत कॅश रकमेचा तुटवडा आहे. म्हणून बँकेने केवळ 5 हजार रुपये आठवड्याला काढता येतील असा सूचना खातेदारांना दिल्या आहेत. काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल.

खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र अनेकांच्या एफडी परिपक्व झाल्या आहेत, लग्न, हॉस्पिटल अशा कारणांमुळे पैशाची गरज आहे. मात्र बँकेतर्फे केवळ 5 हजार रुपये काढण्याची मुभा दिली जात असल्यामुळे खातेदारक आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Sanju Samson Statement: कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही संजूने या खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव

Adani Group News: अदानी ग्रुपच्या ६ कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस, नेमकं काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT