Amravati: परसबागेत फुलवली चक्क अंमली पदार्थाची शेती!

घराशेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत चक्क अंमली पदार्थाची शेती करून अवैधपणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात गठन केलेल्या पथकाने धडक कारवाई करीत मुसक्या आवळल्या आहेत
Amravati: परसबागेत फुलवली चक्क अंमली पदार्थाची शेती!
Amravati: परसबागेत फुलवली चक्क अंमली पदार्थाची शेती!अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: धामणगाव Dhamangaon रेल्वे तालुक्यात घराशेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत चक्क अंमली पदार्थाची शेती Drug cultivation करून अवैधपणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात गठन केलेल्या पथकाने धडक कारवाई करीत मुसक्या आवळल्या आहेत.

हे देखील पहा-

अंमली पदार्थ विक्रीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी यांच्या नेतृत्वात आज दुपारी दोनच्या सुमारास आठवडी बाजारात धडक कारवाई करण्यात आली.

Amravati: परसबागेत फुलवली चक्क अंमली पदार्थाची शेती!
आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार; रिक्षा मध्येच झाली महिलेची प्रसुती!

शहरातील आठवडी बाजारात शेख इस्माईल शेख बाबा (वय २०) याने आपल्या घराच्या मागे असलेल्या जागेचा परसबागेच्या जागेचा वापर करीत चक्क १० ते १२ फुटाचे गांजाचे झाडे लावून अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय थाटला होता. तर दुसरीकडे तालुक्यातील बाघोली येथील एका शेतात झोपडीत आरोपी अमोल नंदू जयस्वाल बाहेरून गांजा विकत आणून त्याच्या प्लास्टिक पिशवीत पॅकिंग करून विकण्याचा अवैध व्यवसाय थाटला होता. यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com