South Solapurs Wangi village heartbreaking case Saam
महाराष्ट्र

ह्रदयद्रावक! एकानं आयुष्य संपवलं, दुसऱ्यानं शेतात गळफास घेतला; दोन्ही मित्रांच्या मृत्यूनंतर सोलापुरात हळहळ

South Solapurs Wangi village heartbreaking case: दक्षिण सोलापूर तालुक्यात एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले.

Bhagyashree Kamble

  • दक्षिण सोलापुरातील वांगी गावात २ जिवलग मित्रांनी आयुष्य संपवलं

  • मित्राच्या मृत्यूचा धक्का असह्य

  • मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

सोलापुरातून एक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहे. एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्रानंही टोकाचं पाऊल उचललं. दुसऱ्या मित्रानं शेतात जाऊन झाडाला लटकून आयुष्याचा दोर कापला. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दक्षिण सोलापुरातील वांगी गावातून हे प्रकरण उघडकीस आलं. या दोन जिवलग मित्र राहत होते. दोघांची मैत्री गावभर चर्चेत होती. मात्र, याच दोन जिवलग मित्रांनी आयुष्य संपवलं. वांगी गावातील गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे आहेत. आधी गोरख भोई यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याची माहिती मिळताच मित्र सुरेश भोईला जबरदस्त धक्का बसला. गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेक्ष भोई ढसाढसा रडले. त्याला या सर्व गोष्टी अनेपक्षित होत्या. सुरेशनं तिथेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश भोई याने शेतात जाऊन झाडाला लटकून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भोई याचे आई-वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. सुरेशच्या मृत्यूनंतर आई वडिलांना जबरदस्त धक्का बसला. दोन जिवलग मित्रांच्या मृत्यूनंतर गावातही शोककळा पसरली. दरम्यान, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आलीये. दोन मित्रांनी आत्महत्या करून आयुष्य का संपवलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Garje Case: 'श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या', डॉक्टर गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो

Maharashtra Live News Update : ‘हि-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, धर्मेंद्र यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची भावुक प्रतिक्रिया

Pension: ३० नोव्हेंबरआधी ही ३ कामे कराच, अन्यथा मिळणार नाही पेन्शन; थेट नोटीस येणार

Screen time impact: लहान वयात मुलांच्या हाती स्मार्टफोन देणं ठरतंय घातक; तरूणपणात करावा लागतोय मानसिक आरोग्याशी संघर्ष

Shocking : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून बापाच्या डोक्यात हैवान घुसला, मुलीसमोरच आईची केली हत्या

SCROLL FOR NEXT