Solapur Crime x
महाराष्ट्र

Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

Solapur News : सोलापूरमध्ये एका ३ वर्षीय चिमुकलीची तिच्या सावत्र आईने हत्या केली आहे. शुल्लक कारणांवरुन महिलेने लहान मुलाचा गळा दाबून तिचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Yash Shirke

  • सोलापूरमधून धक्कादायक प्रकार समोर

  • सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुरडीला संपवलं

  • पोलिसांनी सावत्र आईला अटक केली आहे

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Solapur : सोलापूरमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे एका महिलेने तिच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केली. गेल्या काही वर्षांपासून आरोपी महिला तिच्या सावत्र मुलींचा सतत छळ करत होती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जेवण करत नाही, शाळेत जात नाही अशा शुल्लक कारणांवरुन तीन वर्षांच्या चिमुकलीची तिच्या सावत्र आईने हत्या केल्याचा आरोप होत आहे. मुलीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सावत्र आईला अटक केली आहे. शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास महिलेने राग अनावर न झाल्याने मुलीला संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवळ स्टॉप येथे महिला तिचा पती आणि पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलींसह एका भाड्याच्या घरात राहत होती. आरोपी महिला तिच्या दोन्ही मुलींना शुल्लक कारणांवरुन अमानुष मारहाण करत होती. जेवण न करणे किंवा शाळेत न जाणे यांसारख्या छोट्या कारणांवरुन मुलींचा छळ सुरु होता.

काल (१ ऑगस्ट) महिलेचा राग अनावर झाला. महिलेने तिच्या ३ वर्षीय सावत्र मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquito Agarbatti: अगरबत्ती की विषारी धूर? डासांना पळवणारी अगरबत्ती ठरतेय कुटुंबासाठी जीवघेणी; घरात वापरण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात

आपवर ईडीची नजर! राज्यसभा खासदारावर मोठी कारवाई, निवासस्थानासह ८ ठिकाणी EDची छापेमारी

प्रेमसंबंधातून थरकाप उडवणारा खून! तरुणीला विष देऊन संपवलं अन्…

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT