Solapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime : गाडीचा हॉर्न जोरात वाजविल्याच्या कारणावरून जोरदार राडा; दोन गटात तुफान दगडफेक, सातजण जखमी

Solapur News : घटनेत घोंगडे वस्ती परिसरातील रहिवासी रऊफ इनामदार आणि त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत समोरच्यांना रस्ता सोडण्याची मागणी केली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : रात्रीच्या सुमारास वस्तीतील रस्त्यावरून जाताना साईड मागण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजविला. मात्र गाडीचे हॉर्न जोरात का वाजवला या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. यानंतर त्याचे पर्यावसन तुफान दगडफेकीत झाल्याची घटना सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे. सदर घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक आहे.

सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात हि घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घोंगडे वस्ती परिसरातील रहिवासी रऊफ इनामदार आणि त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत समोरच्यांना रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो? यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली.

दोन्ही गटांकडून दगडफेक 

वाद निर्माण झाल्याने दोन्ही गटातून काहीजण आमनेसामने आले. किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर आधी भांडणात झाले. त्यानंतर दोन्ही गटाचे सुमारे तीनशे हुन अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आला. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत माजी नगरसेवक बिपीन पाटील याच्यासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांचा फौजफाटा दाखल 

यावेळी परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आक्रमक भूमिकेत घटनास्थळी गर्दी केलेल्या तरुणांना पोलिसांनी पांगवले. रात्री उशिरा जखमीना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bottle For Drinking Water : कोणत्या बॉटलमधून पाणी प्यावे? ९९% लोकांना नसेल माहित

Mumbai To Sangli Travel: मुंबईहून सांगलीपर्यंतचा प्रवास कसा कराल? 'हे' मार्ग तुमच्यासाठी आहेत उत्तम

Maharashtra Live News Update: पुण्याच्या करंजावणे गावात शेतात रुतले १० ट्रॅक्टर

Amla Supari Recipe: डायजेशनसाठी उत्तम, चवीलाही जबरदस्त; घरगुती आवळा सुपारी कशी कराल?

ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, ESIC मध्ये मोठी भरती, पगार १७०००० रुपये; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT