Solapur Crime News SaamTV
महाराष्ट्र

Solapur Crime : घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेतला, सगळे पाहुणे घरी आल्यावर सख्ख्या चुलत भावाने कांड केला

Solapur Crime : सोलापुरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्याकडून तब्बल ५ लाखांहून जास्त दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Prashant Patil

सोलापूर : धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वासाने घर उघडे ठेवल्याने तब्बल ५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याने दाखल झालेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या पथकाकडून कौशल्याने तपास केला. यात फिर्यादीच्या चुलत भावानेच चोरी केल्याचे तपासात उघड झालं आहे. पथकाने मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. अनिल शंकर गोलेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

यातील तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर यांचा चुलत भाऊ अनिल गोलेकर याच्या घरी २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने, यातील फिर्यादी आणि त्यांचे नातलग अनिलच्या सोनीनगर येथील घरी ये-जा करीत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्या घराला कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते. या कार्यक्रमादरम्यान २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या घरात ठेवलेले पत्र्याच्या पेटीतील सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

गुन्हा करणारा निश्चित होताच पथकाने सापळा रचून आरोपी दागिने विक्रीसाठी जाताना त्याला ७ फेब्रुवारी रोजी मुद्देमालासह मोदी स्मशानभूमी येथून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता फिर्यादीच्या घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

दरम्यान, अशीच काहीशी घटना दोन दिवसांपूर्वी महाकाली शीतला देवीच्या मंदिरात घडली. मंदिरातील दानपेटी चोरट्यांना फोडता न आल्याने दोघांनी आपली शक्कल लढवत चक्क दानपेटीच उचलली. या चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत चोरट्यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही चोर हे अल्पवयीन असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT