FRIEND KILLS FRIEND IN SOLAPUR VAIRAG SHOCKING MURDER CASE Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : सोलापूर हादरले! जिवलग मित्रानेच काढला काटा, दगडाने ठेचून तरूणाची हत्या

Solapur Crime News : सोलापूरच्या वैरागमध्ये मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वैरागमध्ये मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना

  • किरकोळ वादातून संतापाच्या भरात दगडाने मारहाण

  • जागीच मृत्यू; आरोपी घटनास्थळावरून फरार

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; तपास सुरू

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. क्षुल्लक कारणांवरून सुरु झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे असे मृत व्यक्तीचे नाव असून बबलू मुळे असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश उर्फ अप्पासाहेब कापसे आणि आरोपी बबलू मुळे हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान, ‘पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास का पाठवले?’ या मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, आरोपी बबलू मुळे याने संतापाच्या भरात दिनेश कापसे याच्यावर दगडाने वार केले.

डोक्यावर गंभीर मार लागल्याने दिनेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी मृताच्या भावाने वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार बबलू मुळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्वीचे वाद याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या घटनेमुळे वैराग परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळचे जिवलग मित्र असलेले दोघे इतक्या टोकाला जाऊन पोहोचल्याने नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. क्षुल्लक कारणावरून वाढणारे वाद किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करत आरोपीला लवकरच ताब्यात घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मॅट्रिमोनियल साईट्सवर वर्दी दाखवून तरुणींना लुटणारा तोतया PSI गजाआड; २० जणींना लावला लाखोंचा चुना

CM फडणवीसांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास; मुंबईवरून शिर्डीला पोहोचल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Eye Care Tips: डोळे चोळण्यापासून ते अपुरी झोपेपर्यंत, तुमच्या या ८ सवयींमुळे होतंय डोळ्यांचं मोठं नुकसान

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये रक्षक चौकच्या नव्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनापूर्वीच अपघात

SCROLL FOR NEXT