सोलापुरकरांची चिंता वाढवणारी बातमी
सोलापुरकरांची चिंता वाढवणारी बातमी  Saam tv
महाराष्ट्र

सोलापुरकरांची चिंता वाढवणारी बातमी

विश्वभुषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तवली आहे, या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण प्रकर्षाने दिसू लागले आहे. जिल्ह्य़ात करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे ,मागील दहा दिवसांत तब्बल ६१३ मुले करोनाबाधित झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, साधारण सव्वा वर्षांच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण भागात आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक ११ हजार ८८६ मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात ६ हजार ७७३ मुले तर ५ हजार ११३ मुलींचा समावेश आहे. एकीकडे या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील बाधित असणाऱ्या लहान मुलांचा आकडा पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली. यामध्ये जवळपास ६० पेक्षा अधिक मुले करोनाबाधित दिसून आली होती. याशिवाय सुमारे ५०० मुलांमध्ये करोनासदृश लक्षणे आढळून आली त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Edited by Ashwini jadhav kedari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT