Relatives carry the body of a young man after a stretcher broke while taking the body for postmortem at Solapur Civil Hospital. Saam Tv
महाराष्ट्र

स्ट्रेचर तुटला, नातेवाईकांना हातात न्यावा लागला मृतदेह; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Solapur Civil Hospital Stretcher Breaks During Postmortem Transfer: सोलापूरच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. शवविच्छेदनासाठी नेत असताना स्ट्रेचर तुटल्यामुळे नातेवाईकांना मृतदेह हातात घेऊन पुढे जावे लागले.

Omkar Sonawane

सोलापूर शहरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या गलथान कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह स्ट्रेचरवरून नेत असताना अचानक स्ट्रेचर तुटल्याने नातेवाईकांना मृतदेह हातात घेऊन पुढे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जगदीश कोळी (वय 24) हा तरुण भीमा नदीत पोहण्यासाठी गेला असताना बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता. मात्र मृतदेह स्ट्रेचरवरून शवविच्छेदन कक्षाकडे नेत असताना अचानक स्ट्रेचर तुटले. त्यामुळे उपस्थित नातेवाईकांवर मृतदेह हातात घेऊन पुढे नेण्याची वेळ आली. या प्रकारामुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष म्हणजे मृत आकाश कोळी हा तरुण स्वतः याच शासकीय रुग्णालयात कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळे या घटनेबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्काळ व्यवस्था सुधारावी अशी मागणी सोलापूरकरांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Saree Blouse Designs : डेली वेअर साडी दिसेल डिझाइनर, एकदा ट्राय करा 'हे' ५ फॅन्सी ब्लाउज पॅटर्न्स

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली, सिनेसृष्टीवर शोककळा

आणखी एका युद्धाचा भडका? उत्तर कोरियानं डागल्या एकापाठोपाठ एक मिसाईल, २ देश अलर्ट; पंतप्रधान म्हणाले...

Crime: तरुणीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, लग्नावरून येताना अपरहण, जंगलात नेऊन आरोपींनी केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT