Solapur Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : खळबळजनक! सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतून १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब; गावकऱ्यांची झोपच उडाली

Solapur Breaking News : सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Satish Daud

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत दफन केलेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब झाला आहे. शहरातील मोदी स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्मशानभूमीत धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

प्रियांश वाघमारे (वय १० महिने) असं मृत बाळाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबियांनी त्याच्यावर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. आज रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी वाघमारे कुटुंबिय मोदी स्मशानभूमीत पोहचले. यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी एक खड्डा आढळून आला.

प्रियांशचा मृतदेह कुणीतरी उकरून नेला असावा, असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेत तपास सुरू केला आहे. स्मशानभूमीतून मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जादू टोण्याच्या प्रकारासाठी कुणीतरी बाळाचा मृतदेह उकरून नेला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा कसून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता

Saurabh Tayde : सिंदखेडराजामध्ये इतिहास! २१ वर्षीय सौरभ तायडे ठरले सर्वात तरुण नगराध्यक्ष

Rudraksha Benefits: डोकेदुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत; कोणत्या आजारात कोणता रुद्राक्ष फायदेशीर?

Saree Designs: पैठणीपासून कांजीवरम साड्यांची महिलांना क्रेझ, या ५ ट्रेडिंग साडी पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा

Zodiac signs: आजचा दिवस नशीब बदलणारा ठरू शकतो! चंद्र धनु राशीत; या राशींना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT