Bhoyre village Celebrated Stone Rangpanchami  Saam Tv News
महाराष्ट्र

जेवढं जास्त रक्त, तेवढा जास्त पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात खेळली जाते दगडाची धुळवड, वाचा इतिहास

Solapur Bhoyre Stone Rangpanchami : भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडच्या दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. माजी सरपंचांनी दिली माहिती.

Prashant Patil

सोलापूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. एकीकडे संपूर्ण देशात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होत असून, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुलीवंदन म्हणजेच धुळवड साजरी करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती भोयरे गावाचे माजी सरपंच बालाजी साठे यांनी दिली.

भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडच्या दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतो. मागील तब्बल चारशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. गावाकऱ्यांना दगड लागला तरी काहीही होत नसल्याची भावना आहे. जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो.

या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. धुळवडी दिवशी दिवसभर गावातील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. जगदंबा देवीच्या पायऱ्यावर जेवढे जास्त रक्त सांडते त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात, अशी माहिती माजी सरपंचानी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT