A shocking incident in Barshi, Solapur, where a 26-year-old mother allegedly killed her 10-month-old daughter and surrendered to the police, highlighting the tragic impact of domestic distress. saam tv
महाराष्ट्र

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले

Mother Kills Infant Due To Domestic Violence In Maharashtra: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे २६ वर्षीय आईने पतीच्या कथित छळाला कंटाळून १० महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड. आरोपी महिलेने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पतीच्या कथित त्रासाला आणि छळाला कंटाळून एका 26 वर्षीय आईने स्वतःच्या अवघ्या 10 महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, त्यानंतर तिला पाण्याच्या बादलीत बुडवून खून केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ही थरारक घटना बार्शी शहरात घटना बार्शी शहरात घडली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आउणे केवळ धाकट्या 10 महिन्यांच्या मुलीलाच नव्हे तर, आपल्या 6 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या 6 वर्षांच्या निष्पाप बलिकेने आई मी शाळा शिकते, मला मारू नकोस अशी आर्त विनवणी ऐकून आईच मन विरघळले आणि तिने मोठ्या मुलीला सोडले, ज्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला.

हत्येनंतर मृत चिमूकलीला खांद्यावर घेऊन आई थेट पोलीस ठाण्यात

या हृदयद्रावक हत्येनंतर परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पोटच्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी महिला त्या मृत चिमूरडीला आपल्या खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी मुलीची हत्या केली आहे, मला अटक करा असे पोलिसांना सांगितले. महिलेचे हे बोलणे ऐकून पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारीही सुन्न झाले.

या घटनेनंतर १० महिन्यांच्या 'शक्ती' नावाच्या चिमुरडीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेची सविस्तर आणि डोळ्यात पाणी आणणारी माहिती मृत बालिकेची मोठी बहीण तेजल हिने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी आरोपी महिला पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या छळाची पार्श्वभूमी आणि या हत्येमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT