Solapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

जावई भडकला, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; सोलापुरात खळबळ

Solapur Crime News: सोलापुरात जावयाने सासऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

विश्वभूषण लिमये

अक्कलकोट तालुक्यात जावयाकडून सासऱ्याची हत्या

हल्ला करणारा जावयाने आत्महत्याचा केला प्रयत्न

मृत पावलेल्या व्यक्तीची दोन्हीही मुलं पोलीस खात्यात

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात आज मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. अक्कलकोटच्या इंगळगी गावातील शेतात जावयाने सासऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. जावयाने धारदार चाकूने वार करत सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सासऱ्याला संपवल्यानंतर जावयाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता जावयावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिकंदर मुलका शेख असे हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर आरोपी जावयाचे नाव सादिक सैफन दफेदार असे असल्याची माहिती हाती आली आहे. सासऱ्याच्या हत्येप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत सिकंदर शेख यांचा मुलगा आणि मुलगी पोलीस खात्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सासरे सिकंदर शेख हे शेतात होते. त्यावेळी सादिक दफेदार याने धारदार शस्त्राने वार केला. सासऱ्यावर वार केल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार करून घेतला. या घटनेत सासरे सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी जावयाला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता स्वत:वर वार केलेल्या जावयावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटच्या वळसंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून सध्या पंचनामा सुरू आहे. जावईने सासऱ्याचा नेमका खून कोणत्या कारणातून केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

तत्पूर्वी, सासरे सिकंदर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वळसंग परिसरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक आणि सिकंदर यांच्या कुटुंबीयाकडून जावयावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT