K. Chandrashekar Rao In Solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur News: के. चंद्रशेखर राव यांना हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारली, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय

Wakhari Ringan Sohala: के. चंद्रशेखर राव यांनी वखारी येथील वारीच्या प्रसिद्ध रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती.

साम टिव्ही ब्युरो

K. Chandrashekar Rao In Solapur: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव वाखरी येथील रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. के चंद्रशेखर राव यांनी वखारी येथील वारीच्या प्रसिद्ध रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे.

तसेच के चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांच्या 200 सहकाऱ्यांच्या व्हीआयपी दर्शनाचा चेंडू देखील जिल्हा प्रशासनाने मंदिर समितीकडे ढकलला आहे. केवळ मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनाच व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. त्यांच्यासोबतच्या इतर सहकाऱ्यांच्या व्हीआयपी दर्शनाबाबतचा निर्णय आता मंदिर समिती घेणार आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या सर्वांच्या दर्शनाबाबत निर्णय घेणार आहे. दरवर्षी ५ लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक वाखरी रिंगण सोहळ्यात उपस्थित राहतात. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत के चंद्रशेखर राव यांना हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही असे म्हटले. (Marathi Tajya Batmya)

माजी खासदार धर्मांन्ना साधूल यांनी हेलिकॉप्टरद्वारे रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागितली होती परवानगी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्याचे पत्र जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी काढले. (Latest Political News)

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सोलापुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. जवळपास 110 आमदार आणि खासदारांसह 600 गाड्यांचा फौजफाटा घेऊन केसीआर सोलापुरात आले आहेत. यावेळी के चंद्रशेखर राव यांना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणावरून वाद, तरुणाची भररस्त्यात हत्या; ८ जणांना जन्मठेप

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी टेंपल ट्रस्टकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT