सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलंय...जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला आपण संपर्क करू शकतो ते केवळ सोशल मीडीयाद्वारे...कित्येक वर्ष न भेटलेले जीवलग मित्र-मैत्रीणही आपल्याला सोशल मीडियावरच सापडतात...पण जगाला जवळ आणणारं हेच सोशल मीडिया... आपल्या समोर असलेल्या व्यक्तीपासून आपल्याला लांब करत असल्याचे समोर आलंय.
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरित परिणाम होताना दिसताय...गेल्या तीन वर्षांत घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणात समोर आलंय...
काय आहेत कारणं घटस्फोटांची पाहुयात...
सोशल मिडिया आणि घटस्फोट
व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव
नोकरीमुळे जोडीदाराला कमी वेळ देणे
महागाई, आर्थिक जुळवाजुळव, जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणे
वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घटस्फोटाच्या अर्जाची संख्या तीन पटीने वाढलीय 'कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालय.नवरा बायको
सोशल मीडियाच्या रिल्समध्येच अडकल्याने वैवाहिक नाती संशया्या भोवऱ्यात सापडत असल्याचे या अहवालातून ठळकपणे पुढे आले आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक घटस्फोटांची प्रकरणं समोर आलीयेत....
दरम्यान कोणत्या राज्यात घटस्फोटांचे प्रमाण किती आहे पाहुयात
महाराष्ट्र 18.7
कर्नाटक 11.7
प. बंगाल 8.2
दिल्ली 7.7
तमिळनाडू 7.1
तेलंगणा 6.7
केरळ 6.3
राजस्थान 2.5
त्यातही 25 ते 34 या वयोगटात सर्वाधिक घटस्फोट होत असल्याचे समोर आलंय...जीवाचा आटापिटा करून काम करायचं....भविष्यासाठी तजबीज करायची, लांब गेलेली माणसं सोशल मीडियाद्वारे जोडायची....आणि हे सगळं करताना जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत त्यांच्यापासून मात्र लांब जायचं...व्हर्च्युल नाती टिकवायची मात्र जन्मभराचं नातं गमवायचं...म्हणूनच नात्यांसाठी वेळ द्या..रिल्ससाठी नको..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.