Saam Tv
स्लीप डिवोर्स ही संकल्पना अनेक जणांना फारशी परिचित नाही.
मुळात यात नवरा बायकोमध्ये डिवोर्स होतो पण ते वेगळे होत नाहीत.
स्लीप डिवोर्स हा महिला किंवा पुरुष त्यांच्या झोपेसाठी घेतात.
यामध्ये नैसर्गिक क्रिया म्हणजेच झोपेला प्रचंड महत्व दिले जाते.
नवरा-बायको दोघेही जण यामध्ये एका घरात राहून झोपण्याच्या वेळेस वेगवेगळे झोपतात.
सध्याच्या धावपळीतल्या जगात आपली स्वप्न आणि गरजा पूर्ण करण्यासाठी लोक स्लीप डिवोर्स हा पर्याय निवडायला लागलेत.
याने शरीराला आवश्यक पुरेशी आणि कोणताही अडथळा न येता शांत झोप मिळू शकते.
ही संकल्पना भारतीयांसाठी नविन आणि अमान्य असू शकते. मात्र याचा फायदा खूप होऊ शकतो.