Saam Tv
प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यातला महत्वाचा काही वेळ पार्कमध्ये घालवायला आवडतं.
जर तुम्हाला सुंदर बाग, रंगीबेरंगी फुलं, लहान तलाव, धबधबा अशा निसर्गाच्या सौंदर्यात काही वेळ घालवायचा असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी आहे.
पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध 'ओकायामा फेंडशीप गार्डन' इथे तुम्हाला डोळे धुपून टाकणारे सौंदर्य पाहता येईल. याला पु.ल. देशपांडे उद्यान सुद्धा म्हंटलं जातं.
हा सुंदर आणि शांत पार्क तुम्हाला पिकनिक सारखा माहोल तयार करून देऊ शकेल. इथे कपल्समोठ्या संख्येने येत असतात.
या पार्कमध्ये गेल्यावर तुम्हाला धबधब्यांचा आवाज, पक्षांचा किलबिलाट, विविध आकाराच्या दगडी, टेकड्या असे दृश्य दिसणार आहे.
तर लहान मुलांसाठी इथे खेळण्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.
हा पार्क पुण्याच्या सिंहगड रोड, दत्तवाडी या भागात आहे.
सकाळी ६ ते १०.३० मग दुपारी ४ ते ८ यावेळेत हे पार्क खुले असते.
तुम्ही पुणे स्टेशनपासून ७.६ किमी अंतरावर असलेल्या ओकायामा पार्कला टॅक्सीने भेट देऊ शकता.