Saam Tv
उन्हाळा जवळ आला की, लोक कलिंगड खायला सुरुवात करतात.
या ऋतूत मोठ्या संख्येने लोक कलिंगड खाणं किंवा त्याचा ज्युस पिणं पसंत करतात.
उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनमध्ये लोक हे फळ आवर्जून खातात.
पण तरी सुद्धा काही लोकांना या अमृतासारख्या फळाचे महत्व माहित नाही.
तर कलिंगड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि औषधी आहे.
कलिंगडमध्ये सगळ्या फळांच्या तुलनेत जास्त पाण्याची क्षमता असते.
कलिंगडमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे किडणीचे दुखणे, जळजळ, भुक न लागणे या समस्यांपासून सुटका होते.
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी ६ पोटॅशियम यांसारखे गुणधर्म असतात.