Measles  Saam TV
महाराष्ट्र

औरंगाबादकरांची चिंता वाढली; राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश

औरंगाबादेत गोवरचा शिरकाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - मुंबई, मालेगावसह राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये आता औरंगाबादचा (Aurangabad) समावेश झाला असून, शहरातील नेहरुनगरची प्रमुख बाधित विभाग म्हणून नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 96 संशयित रुग्ण आढळले असून, 7 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यामुळे मात्र काहीप्रमाणात शहराच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. जिल्ह्यातील संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (Aurangabad Latest News )

कोरोनाच्या कचाट्यातून सावरत असतानाच आता राज्यामध्ये गोवर या आजार थैमान घातले आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये या आजाराची रुग्ण आढळून आली होती त्यानंतर हळूहळू हा आजार इतर शहरांमधे पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुलांसाठी शहरातील 40 आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येतीय. पालकांनी आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

वडाळ्यात ५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंबईत गोवरने 15 वा बळी घेतला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या गोवर संशयित पाच महिन्यांच्या मुलाचा गोवरने मृत्यू झाला. या मुलाला सर्दी, खोकला, ताप, चेहरा तसेच छातीवर पुरळ अशी लक्षणे होती. मुंबईत गोवर (Mumbai) रुग्णसंख्या वाढतच असून मंगळवारी दिवसभरात 118 गोवर संशयित रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील एकूण गोवर संशयित रुग्णांची संख्या आता 4 हजार 180 वर पोहोचली आहे. तर गोवर निदान झालेल्यांची संख्या 308 झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी गोवर संशयित मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील गोवर संशयित मृतांचा आकडा 15 झाला आहे.

गोवर कशामुळे होतो?

गोवरचा संसर्ग हा नेमका कशामुळे होतो? हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल. गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो.

गोवरची लक्षणे कोणती?

प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT