King Cobra Found In Scooty
King Cobra Found In Scooty saam tv
महाराष्ट्र

Snake In Scooty: भयंकर! स्कूटीच्या हॅण्डलमध्ये बसला होता किंग कोब्रा, दिसताच चालकाच्या काळजाचा चुकला ठोका!

Chandrakant Jagtap

King Cobra Found In Scooty: सापाचं नाव काढलं तरी अनेकांना भीती वाटते. सापांच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही प्रजातीतील साप केवळ दंश करून एखाद्याचा जीव घेऊ शकतात. अनेकदा इंटरनेटवर सापांसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल (snake viral video) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक भलामोठा साप चक्क स्कूटीच्या हॅण्डलमध्ये (Snake In Scooty) जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो किंग कोब्रा आहे. एवढा भयंकर साप स्कूटीमध्ये गेलाच कसा असा प्रश्न तुम्हालाही पडले. परंतु हे खरं आहे. स्कूटीच्या हॅण्डलमधून सर्पमित्राने किंग कोब्राची सुरक्षितरित्या सुटका केली आहे.

या व्हिडिओमध्ये (Snake Video) तुम्ही पाहू शकता एक सर्पमित्र चक्क स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने स्कूटीमधून कोब्रा साप बाहेर काढताना दिसत आहे. कोणतीही भीती न बाळगता आणि कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय तो आपले रोजचे काम असल्याप्रमाणे सापाला बाहेर काढत आहे. हा व्हिडिओ पाहत असताना कोणत्याही क्षणी कोब्रा त्याला दंश करेल असे वाटत राहते. परंतु या सर्पमित्राचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

व्हिडिओमध्ये एक काळा किंग कोब्रा स्कूटीच्या पुढच्या बाजूला स्कूटीत जाऊन बसल्याचे दिसत आहे. हा क्रोब्रा स्कूटीच्या हॅण्डलमध्ये तर जाऊन बसला मात्र तो तिथेच अडकला होता. त्यानतंर स्कूटीच्या मालकाला कोब्रा दिसला तेव्हा त्याला धक्काच बसला. काही क्षण तर त्याला काय करावे सूचलेच नाही. अखेर त्याने सर्पमित्राला बोलवले आणि त्याने सापाची सुखरुप सुटका केली.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @paganhindu या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. यूजर्स त्याला वेगाने शेअर करत आहेत. अवघ्या 39 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 84.5 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT