Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News: समृद्धी महामार्गाने गोवंशाची तस्करी; २५ जनावरांसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावंगी पोलिसात गुन्हा दाखल, ट्रॅकचालकासह क्लीनर फरार

Shivani Tichkule

चेतन व्यास

Samruddhi Mahamarg News Today: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे अल्पावधीतच नियोजित ठिकाणी जाता येते. मात्र या महामार्गाचा आता गोवंश तस्करीसाठीही वापर केला जातं असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईनंतर उजेडात आला आहे. (Latest Marathi News)

महामार्ग पोलिसांनी (Police) समृद्धी महामार्गवरील येळाकेली टोल नाक्यावर सापळा रचून ही कारवाई केली आहे. कारवाईत कत्तलीसाठी जाणारी २५ जनावरे ताब्यात घेत एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकरणी सावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महामार्ग पोलीस हे गस्तीवर असताना त्यांना समृद्धी महामार्गवरून गोवंशाची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी येळावेळी टोल प्लाझाजवळ नाकेबंदी केली. यावेळी एक संशयित ट्रक पोलिसांना दिसला. ट्रकला अडवून पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात जनावरे असल्याचे समोर आले. (Wardha News)

दरम्यान पोलीस आल्याचे लक्षात येताच वाहनचालकासह क्लिनरने घटनास्थळवरून पळ काढला. पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक व ट्रकमधील जनावरे ताब्यात घेत सावंगी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

SCROLL FOR NEXT