वर्धा - संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या आर्वी शहरात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आलेल्या कदम रुग्णालयात (Kadam Hospital) काल पुन्हा खोदकाम करण्यात आले. सुमारे पाच तास खोदकाम सुरु होते. शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळल्याची माहिती पोलीस (Police) निरीक्षक यांनी दिली आहे. (skull was found again in Kadam Hospital arvi)
हे देखील पहा -
तसेच ब्लड सँपलसह काही साहित्य मिळाले आहे. याबाबत वर्धा (Wardha) आणि नागपूर (Nagpur) येथील फॉरेन्सिक टीमने रुग्णालयाची पूर्ण पाहणी सुद्धा केली आहे. याआधी रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 11 कवट्या आणि 54 हाडे सापडली होती.आतापर्यंत या परिसरातून एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहे. यात डॉक्टर रेखा कदम व त्यांचे सहकारी नर्स सह एक अल्पवयीन मुलगा व त्याचे आई-वडीलना यांना अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या पाच इतकी झाले आहे. दरम्यान, गर्भपात प्रकरणी नवीन माहिती समोर येत असल्याने यात मोठ्या रॅकेटचा हात तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कवट्या सापडून येत असल्याने शंका अधिकच गडद होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीकोनातून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.