Corona Updates : लातुरात खळबळ; एकाच शाळेतील 16 शिक्षकांना कोरोनाची लागण Saam TV
महाराष्ट्र

Corona Updates : लातुरात खळबळ; एकाच शाळेतील 16 शिक्षकांना कोरोनाची लागण

कोरोनाची बाधा न झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळा चालूच राहील. तसंच प्रजासत्ताक दिनासह सर्व दैनंदिन उपक्रम चालू राहतील असं विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दिपक क्षीरसागर

लातुर : लातुर जिल्ह्यातील (Latur District) निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील श्री करीबसवेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील सोळा शिक्षकांना कोरोनाची (Corona) बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने येथील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून बाधित शिक्षकांना त्यांच्या विनंतीवरून विलगीकरणासाठी तात्पुरत्या सेवा मुक्तीवर घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सौ सविता मुरूमकर यांनी दिली आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या होत्या त्यानिमित्त विद्यालयातील या रोगाचा संसर्ग रोखता यावा यासाठी पहिल्या टप्प्यात विद्यालयातील सत्तावीस शिक्षकांना प्रथम टप्प्यात चाचणीसाठी पाठवण्यात आले होते यात सोळा शिक्षक बाधीत निघाल्याने शहरातील शिक्षण क्षेत्रात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान कोरोनाची बाधा न झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळा चालूच राहतील प्रजासत्ताक दिनासह सर्व दैनंदिन उपक्रम चालू राहतील असे या श्री करीबसवेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा

PM Awas Yojana : गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Kitchen Tips: लोणचं जास्त दिवस टिकवायचंय? मग प्लास्टिकची बरणी टाळा, होतील गंभीर परिणाम

'...तर डॉक्टर तरूणीचे प्राण वाचले असते'; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT