Dry Skin Face Pack: ड्राय स्किनसाठी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा, घरच्या घरीच ट्राय करा 'हा' फेस पॅक, मिळेल सॉफ्ट स्किन

Shruti Vilas Kadam

मध आणि दुधाचा फेस पॅक

मध त्वचेला खोलवर मॉइश्चर देतो तर दूध त्वचा मऊ व चमकदार बनवते. एक चमचा मध आणि दोन चमचे कच्चं दूध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Face Care | Saam Tv

केळी आणि दही फेस पॅक

केळीमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. अर्धं पिकलेलं केळं मॅश करून त्यात एक चमचा दही मिसळा. हा पॅक त्वचेचा कोरडेपणा कमी करतो.

Face Care

अॅलोवेरा जेल फेस पॅक

अॅलोवेरा जेल त्वचेला थंडावा देऊन कोरडेपणा दूर करतो. ताजं अॅलोवेरा जेल थेट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी धुवा.

Face Care | Saam tv

ओट्स आणि मध फेस पॅक

ओट्स मृत त्वचा काढून टाकतात तर मध त्वचेला पोषण देतो. ओट्सची पावडर आणि मध मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा.

Face Care

बदाम तेल आणि गुलाबपाणी फेस पॅक

बदाम तेल व्हिटॅमिन E ने भरपूर असतं. काही थेंब बदाम तेलात गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा कोमल आणि उजळ होते.

Face Care

मलई आणि हळद फेस पॅक

मलई त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देते, तर हळद त्वचेचा रंग सुधारते. थोडी मलई आणि चिमूटभर हळद मिसळून वापरा.

Face care | Saam tv

अवोकाडो आणि मध फेस पॅक

अवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे ड्राय स्किनसाठी फायदेशीर आहेत. मॅश केलेलं अवोकाडो आणि मध मिसळून १५–२० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.

(हे घरगुती फेस पॅक आठवड्यातून २–३ वेळा वापरल्यास ड्राय स्किन मऊ, पोषणयुक्त आणि नैसर्गिक ग्लोईंग दिसायला मदत होते.)

Face Care

न्यू इयरसाठी घरच्या घरी तयार करा टेस्टी बिस्कीट पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Biscuit Pudding Recipe
येथे क्लिक करा