नागपूर : 'आजकाल चंद्रकांत दादा (Chandrakant Patil) काहीही बोलायला लागले आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं, ते अमरावतीत आले तेव्हा आम्ही त्यांना बांगड्या देऊ म्हटलं होतं, बांगड्या काही कमजोरीचं लक्षण नाही. मात्र, ते पुरुषार्थ गाजवत असतात. आणि ते आमचे राजीनामे मागत असतात त्यांच्या बद्दल काय बोलायचं.' असं वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलं आहे.
दरम्यान त्यांनी आर्वी (Arvi) मधील गर्भपात प्रकरणावरती देखील भाष्य केलं त्याम्हणाल्या, आर्वी अवैध गर्भपात (Illegal Abortion) प्रकरण हे अतिशय धक्कादायक आहे , त्याहून अधिक गंभीर आहे पोलिसांना त्याची माहिती नसणं आम्ही आवश्यक ती कारवाई केली आहे. मात्र, माणसांची मानसिकता देखील बदलण्याची गरज आहे. महिलांनी सुद्धा आता खंबीर होऊन उत्तर द्यायला पाहिजेत. कोणी अरे म्हटलं तर आपण त्याला कारे म्हणण्याची ताकत त्यांनी ठेवली पाहिजे असंही त्या म्हणाल्या.
हे देखील पहा -
माझ्या खात्याला केंद्र आणि राज्याचा निधी मिळतो. निधी वाढवून मिळायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत, अदित दादा थोडे आक्रमक आहेत पण तेवढेच मवाळ पण आहे. रेटून धरलं की निधी मिळतो. नाही मिळाला तर मुख्यमंत्री आहेतच, काही अडचणी असल्या तरी आमचा परिवार आहे असही त्या म्हणाल्या.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.