Pankaja Munde Munde
Pankaja Munde Munde SaamTvNews

Pankaja Munde: बाबासाहेबांचा अपमान मी नाही तर तुम्ही केला, पंकजा मुंडे धनंजय मुंडेंवर बरसल्या

पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात मंत्रिपदाच्या नंबरवरुन राजकारण तापलं होतं. आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे (Pankaja Munde Slams Dhananjay Munde).

Pankaja Munde Munde
'...तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू;' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा

मंत्रिपदाच्या नंबर वरून वाद

32 नंबरच्या मंत्रीपदावरून मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीये. मी माझ्या कामात कधीच भेदभाव केला नाही. मात्र, आत्ताचे पालकमंत्री भेदभाव करतात.

तर टोल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो आणि इतर कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो असं म्हणत पंकजा मुंडे आक्रमक झाल्या होत्या. आज केज (Kej) नगर पंचायतीच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.

Pankaja Munde Munde
Congress: प्रदेशाध्यक्षांच्या विराेधात BJP आक्रमक; मंगळवेढा, बीड, नागपूरात आंदाेलन

बीडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

बीड (Beed) जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरु

सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र, आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com