Nanded to Pandharpur Railway, Ashadhi Wari, Ashadhi Ekadashi saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : पंढरीसाठी नांदेड विभागाच्या सहा विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळापत्रक

या निर्णयामुळे भाविकांना पंढरीची वारी करण्याची संधी लाभणार आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / भारत नागणे

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त नांदेड विभागातून पंढरपूरसाठी सहा विशेष रेल्वे गाड्या साेडण्याचा निर्णय दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने घेतला आहे. दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनूसार नांदेड, जालना, छत्रपती संभाजी नगर आणि आदिलाबाद येथून ह्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. Maharashtra News)

नांदेड विशेष रेल्वे 28 जून रोजी सकाळी आठ वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून पंढरीसाठी (nanded pandharpur train) सुटेल. जालना पंढरपूर विशेष रेल्वे (jalna pandharpur train) 27 जून रोजी रात्री 7 वाजून 20 मिनिटांनी जालना येथून सुटेल. छत्रपती संभाजी नगर ही विशेष रेल्वे 28 जून रोजी (chhatrapati sambhajinagar pandharpur train) तर पंढरपूर ते छत्रपती संभाजी नगर 29 जून रोजी पंढरपूर (pandharpur chhatrapati sambhajinagar train) येथून सुटेल. आदिलाबाद ते पंढरपूर (adilabad pandharpur train) ही विशेष रेल्वे गाडी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता आदिलाबाद येथून सुटणार आहे अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वे विभागाने दिली आहे.

पंढरीच्या रस्त्यांवरील भिंती झाल्या बोलक्या

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा संकल्पनेतून पंढरपूरात रस्त्यावरील भिंतीवर वेगवेगळ्या साधू संतांचे बोलकी चित्र आणि पोट्रेट पालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत. भिंतीवरील साधू संतांची बोलकी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पंढरपूर शहरातील ठाकरे चौक ते केबीपी काॅलेज दरम्यान नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज संत जनाबाई या साधू संतांसह आषाढी पालखी सोहळ्याचे आकर्षक अशी रंगीबेरंगी चित्रे साकारण्यात आली आहेत.

या निमित्ताने आषाढी यात्रेतील स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संतुलन आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. एक किलोमीटर रस्त्याच्या बाजूला असलेल्या भितींवर प्रथमच सामाजिक संदेश देणारी चित्रे साकारण्यात आली आहेत. या चिंत्रांमुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. पंढरपूर पालिकेच्या या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT