Solapur Accident News Saam tv
महाराष्ट्र

Solapur Accident News: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; टँकर आणि जीपमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू

विश्वभूषण लिमये

Solapur News: सोलापुरातून अपघाताची मोठं वृत्त हाती आलं आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये टँकर आणि जीपचा अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. टँकर आणि जीपमध्ये अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अक्कलकोट देवदर्शन करून गावी जात असताना भीषण अपघात झाला आहे. प्रवास करणारे कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अनुर गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडीजवळ भीषण अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. या नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर अनेक रुग्णवाहिका या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या.

तसेच या नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांनाही दिली. अपघातास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. नागरिकांकडून जखमींची विचारपूस सुरू केली आहे. परिसरातील अनेक नागरिक मदतीसाठी धावाधाव करत आहेत.

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात अपघाताची घटना घडली. या अपघातात तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले.

जीप आणि ट्रकच्या धडकेत या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा मृतामध्ये समावेश आहे. अपघातात मृत्यमुखी पडलेले तिघे जण हे जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT