सुप्रीम मसकर, साम टीव्ही
हाच तो बिबट्या तब्बल तीन तास या बिबट्यानं नाशिककराचं टेन्शन वाढवलं. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील नागरी वस्तीत भरदिवसा बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली. बिबट्यानं धुमाकुळ घालत 6 नागरिकांना जखमी केलं. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनअधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि सुरु झाला रेस्कूय ऑपरेशनचा थरार.
मंत्री गिरीश महाजनांनीही घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी जाळं पेकलं. पण बट्यानं चालाखीनं जाळं तोडत एका वनअधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरच हल्ला केला. पण वनअधिकाऱ्यांची टीम मागे हटली नाही. टीम बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीथीचे प्रयत्न सुरु झाले. बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ज्या घरात बिबट्या लपला होता, त्या घराला वन अधिकाऱ्यांनी चारही बाजूंनी घेरत जाळ्या टाकल्या.
अखेर तीन तासांच्या थरारानंतर डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलं आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. अवघ्या तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कोल्हापूरात रेस्क्यूचा थरार पाहायला मिळाला होता. आता नाशिकमधील बिबट्याच्या दहशतीनं लोकांमध्ये भीतीचं वातवारण आहे. त्यामुळे राज्यभात बिबट्याची दहशत ऱोखणं हे आता वनविभागासमोर मोठं आव्हानं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.