Accident News Saam Tv
महाराष्ट्र

बोथा घाटातील अपघातात बुलडाणा अर्बनच्या संचालकासह सहा जण गंभीर जखमी

एसटी चालक आणि वाहकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

संजय जाधव

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा घाटातुन जाणा-या दाेन वाहनांची टक्कर झाल्याने या अपघातात (accident) सहा जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. सर्व जखमींवर बुलडाणा (buldhana) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (buldhana latest marathi news)

आज दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर परतवाड्यावरून बुलडाण्याकडे जाणा-या एसटी बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात खामगावहून बुलडाणा येथे जात असलेले बुलडाणा अर्बनचे संचालक विनोद मदनलाल केडीया (वय ५५) व त्यांची पत्नी रजनी विनोद केडीया (५০) हे दाेघे जखमी झाले आहेत. तसेच बुलडाणाहून अमरावतीला जाणा-या बुलडाणा येथील ज्येष्ठ पत्रकार भानुदासजी लकडे यांची कन्या स्वाती स्वप्नील सातंगे (२१) यांच्यासह रेखा अंबादास सातंगे (५०), सुहानी सातंगे (१४) व चालक विशाल जोशी (४५) हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT