Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तुम्हाला एकूण किती पक्षी लपलेले आहेत? हे ओळखायचे आहे.
फोटो पाहल्यानंतर तुम्हाला १४ पक्षी दिसतील. पण तुम्ही नीट पाहिल्यास त्यात काही लपलेले पक्षी दिसतील. जर तुम्हाला या फोटोमध्ये १४ पक्षी दिसती तर उर्वरित पक्ष्यांचे चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी लपलेले आहेत.
हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे पक्षी सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.