accident near gotwadi saam tv
महाराष्ट्र

गोरेगावला निघालेल्या वऱ्हाडाचा अपघात; सहा जखमी, चाैघांची प्रकृती चिंताजनक

या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

संदीप नांगरे

हिंगाेली : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणार्‍या वाहनास हिंगोलीच्या (hingoli) सेनगाव (sengoan) तालुक्यातील गोटवाडी (gotwadi) जवळ अपघात (accident) झाला. या अपघातात एकूण सहा जण जखमी (injured) झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (hingoli accident news)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी : आजेगाव येथून गोरेगाव येथे एका विवाह सोहळ्यासाठी वाहनातून व-हाडी मंडळी निघाली हाेती. रस्त्याने एका दुचाकी चालकास वाचविण्यास गेलेल्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटे होऊन थेट एका शेतात घुसले.

या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे असे चाैघांवर उपचार करणा-या वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT