usha more, ratnala more, scc result 2023,
usha more, ratnala more, scc result 2023,  saam tv
महाराष्ट्र

SSC Result 2023 : संसाराचा गाडा हाकत सख्या बहिणींनी दहावीची परिक्षा दिली, निकाल हाती येताच मोरे भगिनींचे डाेळे पाणावले

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेच्या निकाल (10th ssc result 2023) शुक्रवारी जाहीर झाला. दहावीच्या निकालकडे लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं लक्ष लागलं हाेते. त्यातीलच तिशी पार केलेल्या दाेन बहिणींचे देखील निकाल काय लागताे याकडे डाेळे लावून बसल्या हाेत्या. अन् निकाल समजताच दाेघींचे डाेळे पाणावले. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर शुक्रवारी निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

या परिक्षेत तिशी पार केलेल्या दाेघी बहिणींनी उज्जवल यश मिळविले आहे. शिक्षण घेण्याच्या वयात लग्न झाल्याने शिक्षण सुटले आणि संसाराचा गाडा हाकायला प्रारंभ झाला. पुढे जबाबदारी म्हणून शिक्षणासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे दोघी बहिणींनी मुले मोठी झाल्यावर शिक्षण घेण्याचा निर्णय घेत दहावीची परीक्षा दिली.

उषा मोरे व रत्नमाला मोरे असे या सख्ख्य बहिणींचे नाव. उषा मोरे या दहावीला 2005 साली नापास झाल्याने घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे पुन्हा दहावीची परीक्षा त्यांनी दिलीच नाही.

रत्नमाला मोरे यांचे नववीला असतानाच लग्न झाल्याने पुढचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. मात्र प्रौढ महाविद्यालयाच्या माध्यमातून दहावीला प्रवेश घेत मार्च 2023 ची परिक्षा त्या दोघींनी दिली.

या परिक्षेत उषा यांनी 63 टक्के तर रत्नमाला यांनी 64 टक्के गुण मिळवले आहेत. आता उषा व रत्नमाला या दोघींनाही पुढे उच्च शिक्षण घेऊन नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Maps: तुम्हालाही Offline Maps पद्धतीने गुगल मॅप वापरायचा? तर फॉलो करा 'या' स्टेप्स

Arvind Kejriwal gets interim bail: अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन

Audi Q3: आकर्षक लूक अन् जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

Dhule Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 432 मतदारांनी बजावला हक्क

Sharad Pawar News | मोदींची ऑफर! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

SCROLL FOR NEXT