Celebrations erupt in Sindhudurg as BJP-led Mahayuti secures clear majority in Zilla Parishad and Panchayat Samiti elections. saam tv
महाराष्ट्र

ZP Election Result: तळकोकणात फक्त राणे ब्रँड, ठाकरेंची हवा गूल! पंचायत समितीमध्येही राणेंची एकहाती सत्ता, जाणून घ्या संपूर्ण निकाल

Sindhudurg Zilla Parishad Result: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताने दिसत आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याने दक्षिण कोकणात राणे ब्रँडचे वर्चस्व आहे.

Bharat Jadhav

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीला स्पष्ट बहुमत

तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची राजकीय पकड कायम

भाजपने अंदाजापेक्षा अधिक जागा जिंकत दमदार विजय मिळवला

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप दमदार विजय मिळवलाय. तळकोकणात महायुती बहुमताने सत्तेवर बसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसारच निकाल लागलेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची हवा कायम असल्याचे दिसून आलंय. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने बहुमत गाठत सत्ता आपल्या हातात ठेवलीय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समिती जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शनिवारी सरासरी 61.98 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सर्वाधिक धक्का उद्धव ठाकरे गटाला बसला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेपेक्षा अपक्ष उमेदवारांनी अधिक जागा जिंकत मतदारांचा कल बदलल्याचे स्पष्ट केलंय. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या ८ जागा बिनविरोध झाल्या होत्या.

ए्क्झिट पोलमध्ये जिल्हा परिषदेत भाजपला 21 जागा मिळतील असा अंदाज होता. निकाल पाहता येते भाजपनं 26 जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र ठाकरे गटाला येथे फक्त 3 जागा मिळाल्या आहेत.

पंचायत समितीमध्येही राणेंची एकहाती सत्ता आल्याचं पाहायला मिळालं. येथे महायुतीने 87 जागा जिंकल्या आहेत. यात भाजपला 54 तर शिंदे सेनेने 33 जागा जिंकल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 7 जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील आठही पंचायत समितींवर महायुतीची सत्ता आलीय.

सिंधुदुर्ग-

जिल्हा परिषद – पक्षनिहाय जागा

भाजप – २६

शिवसेना (शिंदे गट) – १४

ठाकरे सेना (उबाठा) – ३

अपक्ष भाजप बंडखोर – ७

एकूण मोजलेल्या जागा – ५०

सिंधुदुर्ग जिल्हा – पंचायत समिती एकूण पक्षनिहाय १०० जागांचे बलाबल

भाजप-

दोडामार्ग – 3

कुडाळ – 7

वैभववाडी – 6

देवगड – 12

कणकवली – 15

मालवण – 0

सावंतवाडी – 6

वेंगुर्ले – 5

एकूण भाजप : -५४

शिवसेना (शिंदे गट)

दोडामार्ग – 3

कुडाळ – 6

वैभववाडी – 0

देवगड – 1

कणकवली – 1

मालवण – 12

सावंतवाडी – 6

वेंगुर्ले – 4

एकूण शिंदे शिवसेना :- ३३

ठाकरे सेना (उबाठा)

दोडामार्ग – 0

कुडाळ – 5

वैभववाडी – 0

देवगड – 1

कणकवली – 0

मालवण – 0

सावंतवाडी – 1

वेंगुर्ले – 0

एकूण ठाकरे सेना -7

अपक्ष-

दोडामार्ग – 0

कुडाळ – 0

वैभववाडी – 0

देवगड – 0

कणकवली – 0

मालवण – 0

सावंतवाडी – 5

वेंगुर्ले – 1

एकूण अपक्ष : ६

एकूण पंचायत समिती जागा : 100

भाजप- (54)

शिवसेना- (33)

ठाकरे सेना- (7)

अपक्ष- (6)

एकूण- 100

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राडा; महिला पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षामध्ये बाचाबाची

मुंब्रा हादरलं! कादर पॅलेसमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; CCTV मध्ये कैद थरारक दृश्य|VIDEO

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन

IPL 2026: बटलर-गिलची अर्धशतकी खेळी; गुजरात टायटन्सचा लखनौवर ७ गडी राखून दणदणीत विजय

भोंदूबाबाचा महिलेवर लैंगिक अत्याचार; कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्याने घातला ५० लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT