Eknath shinde News  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, निवडणुकीत पैसे वाटल्याचा वैभव नाईकांचा आरोप; VIDEO चर्चेत

Deputy CM Eknath Shinde: कोकणात एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्यांनी यसंदर्भातला व्हिडीओ देखील फेसबुकवर पोस्ट केला.

Priya More

Summary -

  • वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला

  • स्वतः एकनाथ शिंदेंनी पैशांच्या बॅगा मालवणमध्ये आणल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला

  • व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून हे आरोप करण्यात आले

  • भाजप पदाधिकाऱ्यांकडे रोख रक्कम सापडल्याची दोन प्रकरणे समोर आल्यानंतर वाद आणखी वाढला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यामुळे कोकणातील राजकारणात खळबळ उडाली. 'मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांनीच पैशांच्या मोठ्या बॅगा आणल्या होत्या. पैसे वाटूनच हे लोकं जिंकले आहेत.', असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

वैभव नाईक यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित गंभीर आरोप केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे.

हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे.' तसंच, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले, 'मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतीही घोषणा केली नाही. मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालंय.' तर, भाजपवर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजप दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पैसे वाटून हे लोक जिंकलेले आहेत, असे वैभव नाईक म्हणाले. मालवणमध्ये भाजपकडून पैसे वाटले जात असल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले, 'भाजपा आणि शिंदे शिवसेना दोघेही पैसे वाटत आहेत आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियावर टाकलाय.'

दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडे पैसे सापडल्याची दोन प्रकरण समोर आली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत २५ लाखांची रोख रक्कम असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री नाकाबंदीदरम्यान पोलिसांना भाजप पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये दीड राखांची रोख रक्कम आढळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार? आयोगाकडून त्या व्हिडिओची चौकशी होणार

Suraj Chavan : "जी होती मनात तीच..."; लग्नानंतर सूरजची बायकोसाठी पहिली रोमँटिक पोस्ट

Buldhana: मतदानाच्या दिवशी राडा, ३ बोगस मतदारांना पकडलं; २ गाड्या भरून लोकांना आणलं; काँग्रेसचा आरोप

Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: दहिसरमध्ये चार जणांचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT