Uddhav Thackeray Sabha Saamtv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'आमच्या रक्तात भगवा; नाकावर टिच्चून सेनेचा मुख्यमंत्री करणार...' राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली!

Uddhav Thackeray Sabha: महाराष्ट्र लुटणारे छत्रपतींचा पुतळा उभारून गेले. नौदल दिवस साजरा करून गेले. प्रधानमंत्री इथे आले पुतळा स्थापन केला पण आशीर्वाद घ्यायला विसरले, मी इथे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Uddhav Thackeray Sabha Kokan:

शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंचा कोकणामध्ये झंझावाती सभांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आज सावंतवाडी येथील सभेनंतर जेटी सिंधुदुर्ग येथे ठाकरेंची दुसरी सभा पार पडली. यावेळी मालवण किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या सिंहासनाची पूजा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमानंतर आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"आज मी इथे भाषण करणार नाही तर बोलणार आहे. हा एक क्षण अविस्मरणीय आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर उभं राहिलो तेव्हा ते माझ्याशी बोलताहेत असं वाटलं. ते म्हणाले की तुम्ही माझा जयजयकार करता पण आमच्याकडून काय शिकलात? त्याकाळी अठरापगड जाती एकत्र आल्या आणि स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळेला शत्रू आग्र्यावरून आले होते आता दिल्लीवरून येतायेत," असे म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

आशिर्वाद घ्यायला आलो..

"महाराष्ट्र लुटणारे छत्रपतींचा पुतळा उभारून गेले. नौदल दिवस साजरा करून गेले. प्रधानमंत्री (PM Narendra Modi) इथे आले पुतळा स्थापन केला पण आशीर्वाद घ्यायला विसरले, मी इथे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. संकटे आली. पूर आला होता, कोरोना आला होता, पण आम्ही काम केले," असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

आमच्या रक्तात भगवा...

"सिंधुदुर्ग हा एक मतदारसंघ आहे. तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काहीतरी करायला हवं म्हणून पुतळा उभारून गेले. पण आम्हाला तुमचं नाटक माहिती आहे. आम्ही महाराजांचे एकनिष्ठ अनुयायी आहोत. आमच्या रक्तात भगवा आहे. मी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार," असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

फडतूस झेंडा, भाजपवर टीका..

तसेच "भगव्यामध्ये छेद करण्याचं काम भाजपने (BJP) केलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा काय असतो हे लाल किल्ल्यावर फडकवून दाखवू यांचा फडतूस झेंडा फडकवू द्यायचा नाहीये," असे आवाहनही ठाकरेंनी यावेळी केली. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT