sindhudurg news kudal police arrests 7 in fake marriage case  saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Crime News : लग्नाच्या दुस-याच दिवशी कुडाळमधून नवरीने ठाेकली धूम; नगर, श्रीरामपूर, पंढरपूरसह साता-यात पाेलिसांची कारवाई, 7 अटकेत

Kudal Police Station : कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचे लग्न लावून दिले होते. त्यासाठी त्याच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये घेतले होते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg :

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ पाेलिसांनी (kudal police) लग्नाचा बहाणा करुन फसवणूक करणा-या सात जणांना विविध जिल्ह्यातून अटक केली आहे. या टाेळीने फिर्यादीचे सुमारे एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल हाेती. कुडाळ पाेलिसांच्या कारवाईमुळे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयितांनी कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचे लग्न लावून दिले होते. त्यासाठी त्याच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये घेतले होते. दरम्यान लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरी घरातून पळून गेली. यामुळे फिर्यादीच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला.

या कुटुंबाने मुलीचा शाेध सुरु केला परंतु यश आलं नाही. अखेर नव-यामुलाने कुडाळ पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पाेलिसांनी तक्रार नाेंदवत तपास सुरु केला. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी सात जणांना अटक केली. यामध्ये तीन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. हे संशयित नगर, श्रीरामपूर, पंढरपूर व सातारा येथील आहेत. त्यांची अधिक चाैकशी कुडाळ पाेलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT