students from navodaya vidyalaya sangeli hospitialised SaamTV
महाराष्ट्र

Sindhudurg : नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत

Navodaya Vidyalaya Marathi News : सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सावंतवाडी (sawantwadi) तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात (navodaya vidyalaya sangeli) शिकणाऱ्या तब्बल 133 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) हे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करणार आहेत अशी माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. (Maharashtra News)

सांगेली नवोदय विद्यालयात सकाळी नाष्टा केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. दरम्यानच्या काळात त्रास हाेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. यामुळे शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.

सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. दरम्यान नाष्टा करण्यासाठी वापरलेले बटाटे निकृष्ट दर्जाचे हाेते अशी शंका शाळेतील शिक्षकांनी बाेलून दाखवली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे सावंतवाडी दाै-यावर आहेत. ते सांगेलीतील नवोदय विद्यालयास भेट देणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

कोणत्या भाजीत मोहरी घालू नये

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

SCROLL FOR NEXT