बीड शहरातील (Beed) अंकुशनगर परिसरातील स्मशानभूमीसमोरील रस्त्यालगत काळ्या , पांढऱ्या कापडात भाजून मारलेली कोंबडी, सुया टोचलेली फळे, हळदी - कुंकू व मातीचे भांडे आढळून आल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर यामुळं पोलीस व नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. शहरातील अंकुशनगर भागातील वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात तुरळक लोकवस्ती आहे. या ठिकाणी जाणाऱ्या या रस्त्यालगत काल पांढरे कापड असलेले गाठोडे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी काही नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही माहिती दिली. त्यांनतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान या गाठोड्यात काय आहे ? याची सगळ्यांनाच उत्सुकता व भीती होती , पण त्यात मेलल्या उलट्या पंखांची कोंबडी, वाळू, सुया टोचलेली पपई, केळी तसेच कणकेपासून तयार केलेल्या बाहुल्या, हळदी - कुंकू व मातीचे भांडे आढळले. शिवाय काही चिठ्ठ्या आढळल्या, त्यात अर्धवट नावे असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, अंधश्रद्धेतून अज्ञात मांत्रिकाने हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. हे साहित्य तेथे कोणी फेकले? का फेकले? हे अस्पष्ट असून पोलिसांनी हे सर्व साहित्य नागरिकांसमक्ष त्याच ठिकाणी जाळून नष्ट केले.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.