माथेरान : माथेरानमध्ये वारंवार खुनाच्या घटना होत असताना रायगड पोलीस आणि माथेरान पोलीस या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. माथेरानला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात शनिवार- रविवार माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनाच्या बाबतीमध्ये अनेक उदासीन पोलिसांची दिसून येत आहेत. रायगड पोलीस आणि माथेरान पोलीस या माथेरानच्या सुरक्षेबाबतीमध्ये गांभीर्याने दिसून येत नाही, असंच म्हणावं लागतं कारण सातत्याने अशा घटना घडू देत असताना त्यामुळे स्थानिक पोलीस आणि रायगड पोलिस काय करतात असाच प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवर दिसून येत आहे.
माथेरान येथे घडलेल्या त्या महिला पर्यटकाचा खून प्रकरणात तिचा पती राम सिलोचन पाल याला नेरळ -माथेरान पोलिसांनी ताब्यात घेतलं. 8 तासात पनवेल खांदा कॉलनी येथून या खुनी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने आपण क्राईम पेट्रोल पाहून तिचा खून केल्याची माहितीची कबुली देखील यावेळी खुनी पतीने दिली.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असणारे माथेरान येथे 11 डिसेंबर रोजी पनवेल येथून राम सिलोचन पाल व त्याची पत्नी पूनम राम पाल हे दोघे फिरण्यासाठी आले होते. ते माथेरान इंदिरा नगर येथील खाजगी कॉटेजमध्ये आपले खोटे नाव सांगून वस्तीला राहिले होते. 12 डिसेंबर च्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील रूम केरटेकरला रूमची कडी बाहेरून लावल्याचे दिसून आल्याने, रुम साफ करण्यासाठी गेलेल्या त्या रूम केरटेकरला बेड खाली विवस्त्र (नग्न)अवस्थेत महिलेचा मृत देह विना शीर-मुंडके दिसून आले होते, तर सोबत असलेली व्यक्ती फरार झाली होती. या घटनेने पूर्ण माथेरानसह रायगड जिल्हा हादरून गेला होता. तर घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण परिक्षेत्र DIG सह सारीच पोलीस यंत्रणा तपासाला लागली होती.
माथेरान पोलिसांना मिळालेल्या मयत महिलेच्या पर्सच्या मेडिसिनच्या छोट्याश्या पुऱ्यावरून नेरळ पोलीस व माथेरान पोलीस यांनी मयत महिलेच्या खुनाचा तपास लावत 8 तासात या खुनी पतीला राहत्या घरी म्हणजेच पनवेल खांदा कॉलनी येथून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, LCB चे दयानंद गावडे, शरद फरांदे, भाऊ आघाण, घनश्याम पालवे, यांनी ताब्यात घेतले, तर माथेरान पोलीस ठाण्याचे संजय बांगर हे देखील हजर झाले होते. पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता पाहून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तर या घटनेत एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. मयत महिलेचा पती राम सिलोचन पाल हा आय टी इंजिनीअर असून त्याचे काही महिन्या पूर्वी म्हणजेच 14 मे रोजी पूनम पाल सोबत लग्न झाले होते, ती मुंबई गोरेगाव येथे राहणारी असून मालाड येथे एका खाजगी रुग्णालयात जॉब करत होती, तर नुकतेच पुनमचे लग्न झाल्याने रीतिरिवाजा नुसार ती काही महिन्यांपासून पती पासून दूर म्हणजेच तिच्या आईच्या घरी गोरेगाव येथे राहत होती. तर यात पती राम पाल याला पत्नी पुनमच्या चारित्र्यावर संशय येत असल्याने तिला माथेरान येथे तो फिरण्यासाठी घेऊन आला होता. त्या रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्याने आपण पाहत असलेल्या क्राईम पेट्रोल या tv सिरीयल प्रमाणे, झोपेत आपल्या पत्नीचा गळा दाबून तिला ठार केले, त्यानंतर बाथरूम मध्ये तिला नेऊन तिचा गळा कापून शरीरापासून वेगळा केला असल्याची माहिती समोर आली. शिवाय पत्नीच्या हातावर असलेले आपले नाव देखील शस्त्राने कापून, पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील कपडे काढून सर्व रक्तस्त्राव साफ केले होते.
तर मयत पत्नीचे शरीर बेड खाली नग्न अवस्थेत ठेऊन, शीर-मुंडके पिशवीत गुंडाळून सोबत घेऊन, तिचे पर्स देखील घटनास्थळाहुन काही अंतरावर खोल दरीच्या बाजूस टाकून दिली होती. एकूणच संशयाच्या भवऱ्यात अडकलेल्या पतीने, पत्नीला संपवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्लॅन आखला होता, त्यासाठी त्याने माथेरानमध्ये तो पत्नी सोबत दोन वेळा सोबत देखील येऊन गेल्याच समजतंय, तर आता मयत पुनमच्या कुटुंबाकडून असे सांगण्यात आले आहे की लग्न झाल्यापासून पुनमच्या सासरकडील मंडळींकडून पैशाची मागणी वाढत असल्याने देखील पूनम तणावाखाली येऊन पैसे देण्यास त्यांना नकार देत होती. एकूणच पवित्र अग्नी समोर सात फेऱ्या घेऊन सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेणारचं जर पती नराधम म्हणून काळ बनून येत असेल तर आई बापाने वाढवलेली मुलगी कोणाच्या भरवश्यावर सुखी राहणार हा एक मोठा प्रश्न आता यानिमित्त समोर येत आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.