shivsena and ncp logo saam tv
महाराष्ट्र

Politics: सेना नेते चिडले; डिवचू नका, एनसीपीला इशारा, भाजप प्रवक्ते झालात? काँग्रेसला सवाल

मावळ लोकसभेची जागेवरुन उडाला राजकीय भडका

लक्ष्मण सोळुंके

जालना : लोकसभा निवडणुकीला (loksabha election) अजून दाेन वर्ष आहेत. त्यामुळे मावळ (maval) लोकसभा मतदार संघावर दावा करून राष्ट्रवादीने (ncp) संभ्रमावस्था निर्माण करू नये असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडसावले. (maval latest marathi news)

मावळ लोकसभेची जागा पार्थ पवार (parth pawar) यांच्यासाठी सोडण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सोशल मिडियावर (socail media) पोस्ट टाकून केली. त्यावर बारणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बाेलवता धनी वेगळा असल्याचे म्हटलं. ते म्हणाले मावळ लोकसभेची जागा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मागण्यात येत असली तरी यामागील कर्ते धर्ते वेगवेळेच असून त्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

महाविकास आघाडीतुन (mva) शिवसेनेला (shivsena) डिवचण्याच काम राष्ट्रवादी (ncp) करत असेल तर त्यांना देखील शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल असंही बारणे यांनी नमूद केले. मावळच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हेच निर्णय घेतील असंही त्यांनी केले. माझ्या मतदार संघात मुख्यमंत्री चांगला निधी देत असल्याने चांगली कामे होत असल्याचं सांगत राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचू नये असंही बारणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जालन्यात काँग्रेस शिवसेनेला डिवचत असून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल हे भाजपचे प्रवक्ते झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला. काँग्रेसची भाजप झाली असून भाजपला गाडण्याची ताकद शिवसेनेत असल्याचं देखील खोतकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT