ऑनलाईन राष्ट्रीय लाठी स्पर्धेत मुरुडच्या श्रावणीला कांस्य पदक राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

ऑनलाईन राष्ट्रीय लाठी स्पर्धेत मुरुडच्या श्रावणीला कांस्य पदक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: राष्ट्रस्तरीय ऑनलाईन लाठी स्पर्धा नुकतीच 29 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून ऑनलाईन लाठी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील मुरुडची आठ वर्षीय कन्या कु. श्रावणी देवेंद्र पोकळ हिने नेत्रदिपक कामगिरी केली. एक हात लाठी फिरविणे या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक (कास्य पदक) मिळविले. या स्पर्धेमध्ये एकूण अकरा राज्यातील चारशे पन्नास विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. श्रावणीच्या या यशाने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लाठी स्पर्धेत महाराष्ट्राला 18 सुवर्णपदक मिळाली आहेत. (shravani pokal from raigad has won bronze medal in the online national lathi competition)

हे देखील पहा -

लाठी चालविणे हा शिवकालीन खेळ आहे. शिवकाळात लाठी, दांडपट्टा हे खेळ खेळले जात होते. त्यामुळे शरीर कडक आणि सदृढ होत होते. शिवकाळात महिलाही लाठी काठी कसरत करीत होत्या. त्यामुळे शत्रूशी दोन हात लाठीच्या साहाय्याने पोरी-बाळी करीत होत्या. कालानुरूप लाठी चालविणे हा खेळ बंद झाला असला तरी पुन्हा या खेळाकडे मुले वळताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातही लाठी चालविणे खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

लाठी चालविणे या खेळाची आवड मुलांना व्हावी यासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भाव असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये स्पर्धकाला एक किंवा दोन हाती लाठी चालविण्याचा एक ते तीन मिनिटांचा व्हिडीओ आयोजकाकडे पाठवायचा होता. ही स्पर्धा 29 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. देशातून 11 राज्याच्या साडे चारशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.

यामध्ये मुरुडची आठ वर्षीय श्रावणी पोकळ हिचा तिसरा क्रमांक आला असून तिला  कांस्य पदक मिळाले आहे. तर या स्पर्धेत महाराष्ट्राला 18 सुवर्ण पदके मिळाली आहेत. रायगड जिल्हा लाठी असोसिऐशनचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल, सेक्रेटरी सौ. प्रियांका संदेश गुंजाळ, सहसचिव सिद्धेश सुनील सतविडकर तसेच कमिटी मेंबर रोहित राजेंद्र भायदे यांच्या हस्ते श्रावणी हिला पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT