shoumika mahadik, satej patil, gokul dudh sangh, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Gokul Dairy AGM : 'गोकुळ' च्या सभेत शौमिका महाडिकांचा आवाज दाबला, गुंड आणल्याचा सतेज पाटलांचा पलटवार (पाहा व्हिडिओ)

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय आराेप प्रत्याराेप दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Gokul Dudh Sangh AGM :

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा (gokul dudh sangh agm latest marathi news) आज (शुक्रवार) प्रचंड गदारोळात संपन्न झाली. विरोधी संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांना बोलण्याची संधी न दिल्याने महाडिक समर्थकांनी सत्ताधा-यांच्या विराेधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचंड गदारोळात आणि घोषणाबाजीत सत्ताधाऱ्यांनी आजच्या सभेपूढील सर्व विषय मंजूर केले. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाची सभा आज 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेस दुपारी एक वाजता कागल पंचतारांकित MIDC मधील महालमक्षी पशुखाद्य खारखाण्याच्या आवारत भव्य मंडपात सुरुवात झाली.

सभास्थळी पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

सभास्थळी कार्यकर्त्यांना एन्ट्री पॉइंटला पोलिसांना सामाेरे जावे लागत हाेते. त्यात काहींनी पाेलिसांनी कडे तोडून प्रचंड गोंधळ घालत आता प्रवेश केला. यावेळी वातावरण तणाव पूर्ण बनल होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अक्षरशः बॅरिकेट वाकवून आणि उड्या मारत मंडपात प्रवेश केला.

महाडिक समर्थकांची घाेषणाबाजी

दरम्यान सभेला सुरुवात होताच विरोधी संचालिका शौमिका महाडिक आपल्या सभासदांना घेऊन सभा मंडपात दाखल झाल्या. सभासदांच्या हातात त्यांचे नेेते महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे फोटो असलेले झेंडे पोस्टर्स हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

कार्यकर्ते आमने सामने

यावेळी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घाेषणाबाजी सुरु केली. यामुळे महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्ते आणि सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत असल्याचे दिसून आले.

महाडिक कंपनीने गुंड आणले : सतेज पाटील

गोकुळच्या सभेत महाडिक कंपनीने गुंड घुसवल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला. तसेच सभा शांततेतच होणार आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष देणार असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले हाेते.

नियमाप्रमाणेच सभा संपन्न : अरुण डोंगळे

सभामंडपात दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होताच गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सर्व विषय वाचण्यास सुरुवात केली. हे सर्व ठराव सभेत एकमताने मंजूर झाल्याची माहिती डाेंगळे यांनी दिली. तसेच गोकुळची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही नियमाप्रमाणेच संपन्न झाल्याचा दावा अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

मला बाेलू दिले नाही : शौमिका महाडिक

दरम्यान सभेत विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांना बोलण्यास अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी विरोध केल्याचे महाडिक यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ सभासदांनी ठराव मांडायचे असं सांगत मला बोलण्यास सत्ताधा-यांनी विरोध केला. यावेळी महाडिक यांना सभेमध्ये बोलण्याची संधी न दिल्याने समर्थकांनी प्रचंड गोंधळ केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT