मुद्रांक साम टीव्ही
महाराष्ट्र

नेवाशात मुद्रांकाचा तुटवडा, नागरिकांची गैरसोय

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः नेवासे तहसील कार्यालयात मुद्रांकाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुद्रांक खरेदीसाठी कोविड काळातही मोठी झुंबड याठिकाणी पाहायला मिळते. चार पैकी एकाच मुद्रांक विक्रेत्यावर सध्या मुद्रांक विक्रीचा डोलारा उभा असून मुद्रांक खरेदीसाठी चार-पाच तास रांगेत उभे रहावा लागत असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नेवासे तहसील कार्यालयात परवानगीधारक एकूण चार मुद्रांक विक्रेते आहे. मात्र, गेल्या यापैकी दोघे विक्रेते गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून कोषागार कार्यालयाकडेचे फिरकलेच नसून त्यांनी आपले परवाने नूतनीकरण देखील केलेले नसल्याची माहिती आहे.

इतर दोघांपैकी एक आठवडा-महिन्याभरातातून एकदा-दोन मुद्रांक विक्री करतो. नेवासे तहसील कार्यालयात दररोज नेवासे व शेवगाव तालुक्यातील शेकडो नागरीक मुद्रांक खरेदीसाठी नेवासे येथे केवळ एकाच मुद्रांक विक्रेत्याकडे गर्दी असते.
मुद्रांक विक्रेत्यांवर दुय्यम निबंधक कार्यालय व मुद्रांक जिल्हाधिकारी विभागाचे नियंत्रणच राहिले नसल्याचे आरोप मुद्रांकाच्या कृत्रिम टंचाईला वैतागलेल्या नागरिकांनी केला आहे. मुद्रांक बरोबरच वीस, दहा व पाच रुपयांचे तिकिटेही मिळत नसल्याने नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त होत आहे.
मुद्रांक खरेदीच्या रांगेत 'शेवगावकर'
शेवगाव येथील मुद्रांक विक्रेता तिथे सातत्याने उपस्थितच राहत नसल्याने शेवगाव तालुक्यातील पन्नास टक्के मुद्रांक ग्राहकांचा मोर्चा नेवासेकडे येत असून तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठीच्या रांगेत शेवगाव तालुक्यातील नागरिकही पाहायला मिळतात.
"मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांची अडवणूक किंवा अडचण येणार नाही यासाठी संबंधीत विभागाच्या अधिकाऱयांना याबाबत सूचना देण्यात येतील.
-रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे

"मुद्रांक खरेदीसाठी गेली दोन-तीन दिवसांपासून मी नेवशाला येतो. मात्र आधीच या ठिकाणी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्येंत खरेदीसाठी मोठीगर्दी व रांग असते. संबंधित विभागाने ही मुद्रांकाची कृत्रिम टंचाई दूर करावी.
- राजेंद्र नागरे, जैनपूर, ता. नेवासे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT